झाडांना गेरू-चुना लावून प्रयासतर्फे होळी साजरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

पारंपारिकरित्या साजऱ्या होणाऱ्या होळीला फाटा देत वृक्ष संवर्धनासाठी प्रयास युथ फाउंडेशन रविवारी (ता.12) वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली. गोगाबाबा टेकडी परिसरात प्रयासतर्फे लावण्यात आलेल्या झाडांना गेरू आणि चुना लावून होळी सण साजरी करण्यात आली.

औरंगाबाद - पारंपारिकरित्या साजऱ्या होणाऱ्या होळीला फाटा देत वृक्ष संवर्धनासाठी प्रयास युथ फाउंडेशन रविवारी (ता.12) वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली. गोगाबाबा टेकडी परिसरात प्रयासतर्फे लावण्यात आलेल्या झाडांना गेरू आणि चुना लावून होळी सण साजरी करण्यात आली.

झाडांचा किडीपासून बचाव करण्याचे काम गेरू आणि चुना करीत असतो. यामुळे पारंपरिकरीत्या होळी साजरी न करता पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचा संदेश प्रयासच्या सदस्यांनी दिला. प्रयासतर्फे गोगा बाबा टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. तसेच या झाडांना दर रविवारी पाणी देऊन संवर्धन करण्याचे कामही नियमितपणे करण्यात येत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळत त्या दिवशी "त्या' व्यक्‍तीच्या नावाने वृक्ष लावण्याचा वेगळा उपक्रमही प्रयासतर्फे सुरू करण्यात आलेला आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक जण वाढदिवसावर होणारा खर्च टाळत आपल्या नावने एक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करीत आहेत. होळीच्या कार्यक्रमास अजहर पठाण, अनुरंग डोर्ले, पुष्पक घोरपडे, धनंजय नलांवडे, ज्ञानेश्‍वर सपाटे, रवी चौधरी यांनी सहभाग घेतला.

Web Title: Unique celebration of holi in Aurangabad