अवलिया शिक्षकाची अनोखी निर्मिती

Nanded News
Nanded News

नांदेड : मुलांमध्ये निसर्गतः व सृजनात्मक गुण असतात. म्हणूनच ते प्रत्येक वस्तूचे रंग व आकार याकडे आकर्षित होतात. मुलांमधील सौंदर्य प्रेमाच्या दृष्टिकोनाला समोर ठेवून शहरातील एका हायस्कुलमधील कला शिक्षकाने इंग्रजी मुळाक्षरे ‘ए टु झेड’पर्यंत नाविण्यपूर्णरित्या अक्षर चित्राची ओळख पुस्तकाच्या रूपाने करून दिली आहे.

गोकुळनगरातील फैजुल उलूम हायस्कुलमध्ये शेख जाकीर शेख अहेमद ३२ वर्षांपासून कलाशिक्षकाचे काम करीत आहेत. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या मित्रांनाही चित्रकलेची गोडी लावली. कालांतराने कला शिक्षक होण्याची इच्छाही पूर्ण झाली. त्यानंतरही त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची गोडी निर्माण केली. करीत आहेत. या ३२ वर्षांच्या निरीक्षणानंतर मुलांमध्ये अक्षर ओळख सोप्या आणि मनोरंजनातून कशी निर्माण करता येईल? याचा ते विचार करू लागलेत. दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांना या पुस्तकाची निर्मिती करण्यासाठी यश मिळाले आहे. यासाठी त्यांना मदिनातुल उलूम हायस्कूलचे कलाशिक्षक शेख एजाज यांचे सहकार्य मिळाले आहे.

कौशल्य विकसित होण्यास मदत 
‘आर्टफुल अल्फाबेट’ हे पुस्तक मुलांमधील अपरिचित इंग्रजी अक्षर व शब्दांची भीती दूर करण्यास फायद्याचे ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी अक्षर व शब्दाची गोडी निर्माण करून त्यांची अभिरुची वाढविण्यासही निश्‍चितच मदत होणार आहे. अक्षरे व शब्दांशी ते खेळतील. यामुळे लिहिण्याचे व वाचण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. कल्पना तसेच निरीक्षणशक्तीचा विकास होऊन सतत कृतिशील राहतील. मुलं या पुस्तकातील अक्षरचित्रे आनंदाने काढून कलेचा आस्वाद व रसस्वाद देखील घेतील, असा विश्‍वास लेखक शेख जाकीर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
 
कलात्मक शब्दरचनेतून केली चित्रांची निर्मिती
पुस्तकात कलेचा आधार घेऊन मुलांना आवडणारे निरनिराळे पक्षी, प्राणी व फळे इत्यादींना अक्षरांचे आकार देण्यात आले आहेत. मोहक, रंग, उत्कृष्ट सौंदर्य व कलात्मक शब्दरचनेतून चित्रांची निर्मिती केली आहे. त्यामुळे मुले अक्षरचित्र त्यातील अक्षरे व शब्द सदैव स्मरणात जतन करून ठेवतील. हिंदी व मराठी बाराखडीचेही पुस्तकाचीही निर्मिती लवकरच पूर्ण होणार आहे.
- शेख जाकीर शेख अहेमद (कलाशिक्षक, फैजुल ऊलूम हायस्कूल) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com