Video : प्रलंबीत मागण्यांसाठी अनोखे भजन आंदोलन : कोणाचे ते वाचा

Nanded News
Nanded News

नांदेड : वृद्ध कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह जिल्ह्यातील कर्मचारीवर्गांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या व अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याच्या मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतिने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी (ता. १७ जानेवारी २०२०) भजन आंदोलन केले. 

दोषींवर कारवाईची मागणी 
वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, मोफत घरकुल द्यावे, कलावंतासह त्यांच्या पाल्यांना एस.टी. व रेल्वे प्रवासात सवलत द्यावी, पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, जिल्हास्तरिय कलावंत व साहित्यीक मानधन निवड समितीमध्ये अनुभवी व वृद्ध कलावंतांचीच निवड करावी, सर्व तालुक्यांतून समान वाटप पद्धतीने कलावंतांची मानधनासाठी निवड व्हावी, बांधकाम (दक्षिण) विभागात मुखेड तालुक्यामध्ये कार्यरत शाखा अभियंता फारुख शेख यांचा नियमबाह्य अतिरिक्त कार्यभार व प्रतिनियुक्ती प्रकरणी विभागीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

सोईच्या ठिकाणाहून चालतोय कारभार 
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत नियुक्त अधिकारी, कर्मचारी मुळ पदस्थापनेवर वरिष्ठांना हाताशी धरुन प्रतिनियुक्ती, सेवावर्गच्या नावाखाली सोईच्या ठिकाणाहून कारभार हाकत आहेत. यामध्ये जिल्हापरिषदेची मोठी अस्थापना असलेल्या शिक्षण, आरोग्य विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. दरम्यान, कर्तव्याला खासगी कामाची सांगड घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रतिनियुक्तींच्या कुबड्या घेतल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मोठ्या अस्थापनेतील अरोग्य, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सेवावर्गामध्ये समावेश असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाड पुरविण्याच्या नादात ग्रामीण विकासाला खिळ बसत आहे. 

आदिवासी, नक्षलप्रवण क्षेत्राची स्थिती बिकटन
आदिवासी, नक्षलप्रवण क्षेत्रातील किनवट, माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये नियुक्त अधिकारी, कर्मचारी सेवावर्गाच्या नावाखाली नांदेड मुख्यालय अथवा परिसरातील सोयीच्या ठिकाणाहून कारभार हाकत आहेत. अर्थातच तत्परसेवेला प्रशासनाकडूनच हरताळ फासला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी फिरकत नसल्याने आरोग्य सेवा कोमात तर, शाळा व्यवस्थापनालाच शिस्तीचे धडे गिरवावे लागत आहेत. 

अध्यक्षांचे आदेश धाब्यावर  
सोईच्या ठिकाणाहून कारभार हाकणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी आदी मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्सने काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन केले होते. तेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगांवकर यांनी अंदोलकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सोबतच, संबधित विभागालाही प्रश्‍न सोडविण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हा परिषद सामान्य प्रशासन, समाजकल्याण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप संघटनेने केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com