औरंगाबाद: विद्यापीठासह, महाविद्यालये पोलिसांच्या रडारवर

शेखलाल शेख
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद : साई इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्‍नॉलॉजीचे कारनामे बाहेर आल्यानंतर आता असे गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालये पोलिसांच्या कचाट्यात येणार आहेत. विशेषत विद्यापीठातील जबाबदारांसह परिक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी गूरूवारी (ता. 18) दिली.

औरंगाबाद : साई इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्‍नॉलॉजीचे कारनामे बाहेर आल्यानंतर आता असे गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालये पोलिसांच्या कचाट्यात येणार आहेत. विशेषत विद्यापीठातील जबाबदारांसह परिक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी गूरूवारी (ता. 18) दिली.

साई अभियांत्रिकी महाविद्यालायाकडून विद्यापीठ कायद्या धाब्यावर बसवून गैरमार्ग अवलंबविला. परिक्षा झाल्यानंतरही पून्हा पेपर सोडवण्याचे कारस्थान करण्यात आले. यात प्राचार्य, प्राध्यापक व कस्टोडीयनचा सहभाग असल्याचे समोर आले. या बाबी संस्थाचालक गंगाधर मूंढे व मंगेश मूंढे यांना माहिती होत्या. त्यांचेही याला समर्थन होते, अशा बाबींची कबूली साई महाविद्यालयाचा प्राध्यापक विजय आंधळे याने पोलिसांकडे दिली. त्यामूळे संस्थाचालक, प्राचार्यासह प्राध्यापकांनी शिक्षणाचे "दिवे' लावल्यासे स्पष्ट झाले. विशेषत: पून्हा पेपर सोडवणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या अकलेचे दिवाळेही निघाले. पोलिस आयूक्त यादव म्हणाले, ""ज्यावेळी परिक्षेची निर्धारित वेळ संपली, त्यावेळीच विद्यापीठाने पेपर स्वत:च्या ताब्यात का घेतले नाही, ते पेपर का घेवून जात नव्हते, याची विचारणा केली जाईल. तसेच विद्यापीठातील जबाबदारांसह परिक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाईल. असे गैरप्रकार करणारी महाविद्यालये आमच्या रडारवर आहेत.'' एकप्रकारे त्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळला जाईल असाच इशारा महाविद्यालयांना दिला आहे.

राजकीय दबाव होता..
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. यामूळे हितसंबंध असलेल्या काही राजकारण्यांनी पोलिस विभागातील वरिष्ठांना फोनही केले. तसेच बऱ्याच जणांनी पोलिस आयूक्तालयात धाव घेतली होती. कारवाईनंतर पोलिसांवर राजकीय दबाव होता, परंतू याला न जूमानता पोलिसांनी कूणालाच सूट न देता सर्वांवर गून्हे नोंदवून अटक केली.

Web Title: University, colleges radar in the police department