हातात घड्याळ नसते तर...; ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका युवकाने आज (बुधवाऱ) सकाळी चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी निंबाळकर गेले होते.

उस्मानाबाद : हल्लेखोराने माझ्या उजव्या हातात हात दिल्यानंतर हल्ला केला. पण, माझ्या डाव्या हाताच्या मनगटावर असलेल्या  घड्याळामुळे चाकू त्याच्यावर बसला आणि मी वाचलो, असे उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका युवकाने आज (बुधवाऱ) सकाळी चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी निंबाळकर गेले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अजिंक्य टेकाळे या युवकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने चाकू लपवून त्यांच्यावर हल्ला केला. हातातील घडाळ्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. जनतेच्या आशिर्वादामुळे मी सुखरूप असून मला कोणतीही दुखापत झालेली नाही. आपण हल्ला केलेल्या व्यक्तीला कधीही भेटलो नाही. मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने जखम खोल नाही, असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown assailant attacks Shiv Sena MP Omraje Nimbalkar with a knife