Unquenchable promotion cannot be denied due to retirement says Bench
Unquenchable promotion cannot be denied due to retirement says Bench

निवृत्तीपर्यंत सेवा देऊनही कालबद्ध पदोन्नती नाकारणे अयोग्य : खंडपीठ 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील शिक्षकाने सेवेची बारा वर्षे पूर्ण करून, सेवानिवृत्तीपर्यंत सलग सेवा असताना कालबद्ध पदोन्नती नाकारणे अयोग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हामे यांनी दिला. 

केवळ गोपनीय अहवाल प्रतिकूल असल्याचे कारण पुढे करीत सेवाप्रवेशोत्तर परीक्षेतून सुट मिळाली नाही या कारणास्तव कालबद्ध पदोन्नती नाकारणे चूकीचे असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. यासंबंधीतील विभागीय आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवित जिल्हा परिषदेच्या सीईओंना सुनावणीचे आदेश दिले होते. सीईओंनी खंडपीठाच्या निर्देशानुसार सुनावणी घेऊन 45 वर्षांनंतरच कालबद्ध पदोन्नती मान्य केली. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक जनार्दन कांबळे यांना शासन निर्णय 8 जून 1995 नुसार 1 ऑक्‍टोंबर 1994 पासून कालबद्ध पदोन्नती देय असताना त्यांना सेवेत 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांचे 1991- 92 चे गोपनीय अहवाल प्रतिकूल असल्याचे 1997 ला कळविले. तसेच 1996-97 चे गोपनीय अहवाल प्रतिकूल असल्याचे कळवून वयाची 45 वर्षे पूर्ण केलेली असली तरी त्यांनी रितसर सेवाप्रवेशोत्तर परीक्षेतून सूट मिळविली नसल्याचे कारणावरून कालबद्ध पदोन्नती नाकारण्यात आली.

यासंबंधीच्या सीईओंच्या आदेशाविरूद्ध विभागीय आयुक्तांकडे आपिल केले असता ते फेटाळण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने स्वेच्छासेवानिवृत्ती घेतली. कालबद्ध पदोन्नतीसाठी अॅड. विठ्ठलराव सलगरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. विलंबाने कळविलेले गोपनीय अहवाल विचारात घेऊ नये असे प्रतिपादन ऍड. सलगरे यांनी केले. गोपनीय अहवाल प्रतिकूल असतील तर कर्मचाऱ्यास म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असे म्हणणे मांडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com