काय असते उर्दु, अरबी, फारशी 'किताबत' 

शेखलाल शेख 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : आपल्या बोटांच्या जादुने पिढ्यानपिढ्या वाढलेली, मघुल काळात राजाश्रय मिळालेली आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये "चार चॉंद' लावणारी पारंपरिक उर्दू, अरबी आणि फारसी भाषेतील पारंपारिक "किताबत' (कॅलिग्राफी) मागे पडली. संगणक, सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावात पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने हाताने लिखाण होणारी "किताबत' आता जवळपास संपल्यातच जमा आहे. या सर्व कलेची जागा आता संगणकाने घेतलीय. 

औरंगाबाद : आपल्या बोटांच्या जादुने पिढ्यानपिढ्या वाढलेली, मघुल काळात राजाश्रय मिळालेली आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये "चार चॉंद' लावणारी पारंपरिक उर्दू, अरबी आणि फारसी भाषेतील पारंपारिक "किताबत' (कॅलिग्राफी) मागे पडली. संगणक, सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावात पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने हाताने लिखाण होणारी "किताबत' आता जवळपास संपल्यातच जमा आहे. या सर्व कलेची जागा आता संगणकाने घेतलीय. 

Calligraphy Aurangabad
औरंगाबादः सय्यद अब्दुल सत्तार यांनी कुराण शरीफची केलेली किताबत

हाताने लिहणारे मोजकेच कलाकार शिल्लक 

आता कॅलिग्राफी संपुर्णपणे संगणकावर होत असली तरी आजही औरंगाबाद शहरात जुन्या पिढीतील दहा ते पंधरा जण पारंपरिक पद्धतीने हाताने सुंदर "किताबत' करतात. डोळ्याची पारणे फेडणारी कला या जुन्या पिढीतील व्यक्तींमुळे जिवंत आहे. आता नवीन पिढीकडे ही कला हस्तांतरित करण्यासाठी त्यांची धडपड असली तरी नवीन पिढी याकडे फारशी उत्साही दिसत नाही. तरुण पारंपारिक पद्धतीने किताबत करण्याऐवजी संगणकाला प्राधन्य देतात. 

Aurangabad Calligraphy
औरंगाबादः सय्यद अब्दुल सत्तार यांनी हाताने केलेली सुंदर कॅलीग्राफी

किताबतला होता गौरवशाली इतिहास 

कॅलिग्राफीला विविध ठिकाणी वेगवगेळ्या नावांनी संबोधली जाते. अरबी, उर्दू, फारसीतील किताबतला खताती, खुशनविशी असेसुद्धा संबोधतात. राजाश्रयाच्या काळात पारंपरिक पद्धतीत "नरकुल' (बोरू), निब (पत्ती) यांच्या माध्यमातूनही अनेक महान कलाकारांनी इतिहासाची अनेक सुंदर पाने लिहिली होती. ही पुस्तके, सुंदर पाने आजही अनेक जुन्या संग्रहालयांत, ऐतिहासिक वास्तूंत दिसून येतात. या सुंदर किताबतमधून सामाजिक आणि धार्मिक संदेश देण्यात आले.

हेही वाचा - राजकीय चर्चेत वाद, मित्राचा तोडला कान

अनेक शिलालेख, वास्तू, ताम्रपट, पुस्तकांत किताबत आहे. अनेक ऐतिहासिक वास्तूंवरही उर्दू, अरबी, फारसी भाषांतील किताबत दिसते. ती आजही मनाला मोहून टाकणारी आहे. औरंगाबादचा बिबीका मकबरा, पाणचक्की, दौलताबादचा किल्ला, तोफांवर, मशीद, दर्गाह, पुरातन नाणी, जुनी पुस्तके, पाने यांच्यावर किताबत दिसून येते. मुघलांच्या काळात ही कला खूप फुलली, बहरली. किताबत करणाऱ्यांची त्यावेळी वेगळी ओळख होती. 

जुन्या किताबत मधून रोजगार मिळणे अशक्‍य 

पारंपारिक पद्धतीने किताबत करणारे मोजकेच व्यक्ती असल्याने ही पारंपारिक पद्धतीने लिहली जाणारी किताबत संकटाच्या काळातून जात आहे. सर्व काही संगणकावर आल्याने पारंपारिक ब्रशच्या सहाय्याने केलेली किताबात रोजगार मिळवुन देऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही तरुण ही पांरपारिक कला शिकण्यास पुढे येत नाही.

हेही वाचा ः उद्धव ठाकरे यांनी करावा महाराष्ट्र भाजपमुक्त, कोण म्हणाले?

काही तरुण हे काम करतात मात्र ते फक्त आपल्याला छंद आहे म्हणून तर इतर सर्व तरुण आता "किताबत' संगणकाच्या साह्याने लिहू लागले आहेत. ज्या प्रकारचे घाटदार अक्षर तुम्हाला हवे आहे, ते संगणकाच्या माध्यमातून अल्पावधीत तुम्हाला मिळते. कमी वेळेत, कमी खर्चात हे सर्व होत असल्याने पारंपरिक पद्धतीने किताबत करायला फारसे कुणी तयार नाही. 

20 वर्षात किताबतचे अक्षर लेखक वळले इतर व्यवसायांकडे 

संगणक नसताना उर्दू, अरबी, फारसी भाषांतील किताबतला खूप मागणी होती. व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची, रोजगार मिळवून देणारी ही कला होती. पुस्तके, पाने, ताम्रपट, वास्तूंवर सुंदर किताबत केली जात होती. उर्दू, अरबी पुस्तकेसुद्धा या माध्यमातून लिहिली जात होती. वर्तमानपत्रातसुद्धा किताबत करणाऱ्यांना रोजगार मिळत होता.

हेही वाचा ः मूल संकटात असेल, तर काय करावे?

मात्र, संगणक आल्यापासून मागील 20 वर्षांत "किताबत'चे अक्षरलेखक खूप कमी झाले. त्यामुळे अनेकांनी इतर व्यवसायांचा पर्याय निवडला तर काही जणांनी स्वतःमध्ये बदल घडवुन संगणकाच्या माध्यमातून किताबत करायला सुरवात केली. आज अनेक ठिकाणी लागणारे बोर्ड, बॅनरवरील किताबत संगणकाच्या माध्यमातून तयार होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urdu, Farsi, Arabic Calligraphy Declining Speedily