महामार्गाच्या पुलास कठडे नाहीत म्हणून होतोय बांबूंचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

परभणीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीवर रहाटी गावाजवळ महापालिकेचा बंधारा आहे. याच ठिकाणी वसमत-नांदेडसह नागपूर रस्त्याला जोडणारा जुना पूल आहे. सध्या पुलावर मोठाले खड्डे पडल्याने वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

परभणी : परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील पूर्णा नदीच्या रहाटी पुलावरील कठडे तुटल्याने त्यास लाकडी बांबूंचा आधार देण्यात आला आहे. अधिकच अरुंद असलेल्या या पुलाचे कठडे धोकादायक बनले आहेत.

परभणीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीवर रहाटी गावाजवळ महापालिकेचा बंधारा आहे. याच ठिकाणी वसमत-नांदेडसह नागपूर रस्त्याला जोडणारा जुना पूल आहे. सध्या पुलावर मोठाले खड्डे पडल्याने वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. पूल अरुंद असल्याने मोठी वाहनाने एकाच वेळी पुलावर आल्यावर वाहूतककोंडी होत आहे. तसेच पुलाच्या कठडे तुटल्याने त्यास लाकडी बांबूंचा आधार देण्यात आला आहे. याठिकाणी नवीन पूल मंजूर झाला असून, त्याचे रखडल्याने सध्यातरी याच पुलावरुन धोकादायकरित्या वाहतूक सुरु आहे.

Web Title: Using of bamboo for highways