उस्मानाबाद, किल्लारी भूकंपाने हादरले; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जमिनीत आवाज सुरू होऊन घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही सेकंदातच नागरिक घराबाहेर रस्त्यावर आले. लोहारा येथेही काही सेकंद भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, सास्तूर परिसराला आज (मंगळवार) दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जवळपास पाच ते सहा सेकंद हा धक्का होता.

जमिनीत आवाज सुरू होऊन घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही सेकंदातच नागरिक घराबाहेर रस्त्यावर आले. लोहारा येथेही काही सेकंद भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

किल्लारी व लामजना (ता. औसा)  परिसरातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची 3.01 रिष्टल स्केल इतकी नोंद करण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Web Title: usmanabad news: earthquake