एकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

औरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे. त्यात आयुक्तांची काही ठराविक अधिकाऱ्यांवरच मर्जी असल्याचे बोलले जात असून, त्यातून महावीर पाटणी यांच्याकडे आता सातव्या विभागाचा पदभार सोमवारी (ता. 15) देण्यात आला आहे. 

महापालिकेतील अनेक अधिकारी निवृत्त झाले असून, त्या जागेवर भरती करण्यात आली नसल्यामुळे सध्या पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांकडे विविध विभागांचे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहेत. महावीर पाटणी यांच्याकडे तर सहा पदभार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले होते. एका अधिकाऱ्याकडे सहा-सहा विभाग असतील तर ते काम तरी कसे करतील, असा सवाल त्यावेळी सभापती राजू वैद्य यांनी केला होता. पाटणी यांचे मूळ पद हे उपमुख्य लेखापरीक्षक असे आहे. याशिवाय लेखाधिकारी, प्रभाग-फचे वॉर्डअधिकारी, कर वसुली, स्थानिक संस्था कर विभागप्रमुख, सहायक आयुक्त या पाच विभागांचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे खर्चही तेच करणार आणि त्याचे लेखापरीक्षणही तेच करणार. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता कशी येणार? असा प्रश्न सभापतींनी केला होता. त्यावर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी मुख्य लेखाधिकाऱ्यांचे धनादेश वाटपाचे अधिकार काढून ते पाटणी यांना दिले आहेत, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
सभेत झाली होती चौकशीची मागणी 
 पाटणी यांच्याकडे यापूर्वी देखील लेखा विभागाचा पदभार होता, त्यावेळी त्यांनी तब्बल 38 कोटींची बिले वाटप केली. ही बिले देखील ज्येष्ठता यादी डावलून करण्यात आल्याचा आरोप करत राजू शिंदे यांनी चौकशीची मागणी केली होती. 

Web Title: Vacant posts in Aurangabad Municipal Corporation