दोन लाखावर बालकांना ‘दो बूंद’

file photo
file photo

परभणी : जिल्हयात रविवारी (ता.१९) पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील दोन लाखाहून अधिक बालकांना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यासाठी एक हजार ५०० बुथ स्थापन केले होते. आता पुढील पाच दिवस घरोघरी जात तपासणी करत उर्वरीत बालकांना लस देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ५०० बुथच्या माध्यमातून २ लाख ११ हजार १५४ बालकांना पोलिओ प्रतिबंध लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. रविवारी सर्वत्र ही मोहिम राबविण्यात आली. सायंकाळपर्यंत अधिकृत आकडेवारी हाती आली नसली तरी दोन लाखाहून अधिक बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जी बालके लसीकरणासाठी बुथवर उपस्थित राहिली नाहीत, अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस तर शहरी भागात पुढील पाच दिवस पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, खाजगी दवाखाने या ठिकाणी बुथ व मोबाईल टिमव्दारे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागात १ हजार १३१ नगरपालीका भागात १५९ आणि परभणी शहरात २१० बुधवर पोलीओ डोस देण्यात आले.

हेही वाचा व पहा - Video : परभणीत साईभक्तांचे साई जागर आंदोलन ​

परभणीत २१० बुथवर लसीकरण
शहरातील ५४ हजार बालकांसाठी २१० बुधवर लसीकरण करण्यात आले. रेल्वेस्थानक येथे महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आरोग्य सभापती सचिन देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सांवत, भगवान यादव, प्रा. अनंतराव शिंदे, राजकुमार जाधव, गजानन जाधव, अमोल सोळंके आदी उपस्थित होते. २२० कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले होते.

पूर्णा, सोनपेठमध्ये लसीकरणाला प्रतिसाद
पूर्णा: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी (ता.१९ ) शिवसेना नेते संतोष एकलारे यांच्या हस्ते करण्यात आला. जानकी हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक श्यामराव कदम होते संतोष एकलारे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. या वेळी जगदीश जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ गाडेकर, जिल्हा प्रशिक्षण संघाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डॉ. दीपाली भायेकर, पर्यवेक्षक चंद्रकांत काकडे, फारुखी अब्दुल वहीद, गीता बासरे, अश्विनी मोरे, नितीन चिद्रवार उपस्थित होते. तालुक्यातील एक लाख एकसष्ट हजार एकोणतीस बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार असून त्यासाठी ग्रामीण भागात १२२ व शहरी भागात २५ असे १४७ बुथ तैनात करण्यात आले आहेत. तसेच दहा ट्रांझिट आणि सहा मोबाईल टिमद्वारे ही मोहीम यशस्वी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सचिन भायेकर यांनी यावेळी दिली.


सोनपेठ येथे फळांचे वाटप
सोनपेठ (बातमीदार) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन रविवारी (ता. १९) करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर उपस्थित बालकांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात विश्वजीत श्रीकांत विटेकर, शर्वरी गणेश पाटील, सुजल सुभाष सुरवसे या बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उदघाटनानंतर येथील रुग्णांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. विस्थापीत कुटुंबातील बालकांवर या मोहिमेत विशेष लक्ष दिले जात असून संपूर्ण गाव-वस्ती-वाडी व तांड्यावर जाऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शुन्य ते पाच वर्ष वयोमान असलेल्या बालकांना पोलिओची लस पाजली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुभाष पवार यांनी दिली. या वेळी उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या सभापती मीरा बाबुराव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुभाष पवार, गणेश पाटील, सुभाष सुरवसे हे होते. सुत्रसंचालन सुरेखा मुंढे यांनी तर आभार भागवत कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी येथील तालुका आरोग्य विभागाच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता.
 


चारठाणा येथे लसीकरण मोहीम
चारठाणा : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (ता.१९) चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाच हजार ३३० बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. एकूण कामाच्या ९४ टक्के काम झाल्याची माहिती प्राथमीक अरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख माजीद शेख यांनी सांगितले.
या मोहिमेचे उदघाटन येथील सरपंच बालासाहेब चव्हाण व पंचायत समितीच्या माजी सभापती इंदूताई भवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com