उत्पन्न बंद अन् खिसा रिकामा झालाय, मग तुमीच सांगा जगायचं तरी कसं? 

Vadar Community
Vadar Community

लातूर : उन्हाच्या झळा अंगावर झेलत रस्त्यावर खडी फोडून आम्ही रस्ता तयार करतो तर कधी तुमच्या स्वप्नातील घर बांधून देतो. मंदिरे साकारण्यापासून टोलेजंग इमारतींची आम्ही निर्मिती करतो; पण सध्या सर्वच पातळ्यांवर काम बंद झाले आहे. त्यामुळे उत्पन्नही बंद झाले आहे. हातावरचे पोट असणाऱ्या आमच्यासारख्यांनी पुढे जगायचे कसे? सरकार धान्य देते; पण ते शिजवून खाण्यासाठी तेल, मीठ, मिरची आणायची कोठून? खिसा तर केव्हाच रिकामा झाला आहे... अशा शब्दांत वडार समाजातील बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जगात कोरोना या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या विषाणूने अनेकांचे बळी घेतले आहेत. हा फैलाव रोखावा म्हणून देशभरात टाळेबंदी सुरू आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना, दररोज काम करून पोटाची खळगी भागवणाऱ्या मजुरांचे आत्यंतिक हाल होत आहेत. यासंदर्भात वडार समाजातील कामगारांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडून मिळणारे धान्य कमी प्रमाणात मिळत आहे. ते वाढवून मिळावे, अशी मागणीही केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बांधकाम मजूर बाळू टकळगे म्हणाले, ‘‘आमचे नऊ माणसांचे कुटुंब आहे. मी बांधकामाची कामे करून तर पत्नी धुणी-भांडी करून घर चालवतो. पण कोरोनामुळे आमची दोघांचीही कामे बंद झाली आहेत. हाताला कसलेही काम नाही. अशा काळात आम्ही घर चालवायचे कसे? नुसते धान्य मिळाले म्हणून घर चालत नाही. भाज्या, तेल, मीठ आणण्यासाठी पैसा नाही, अशी स्थिती आहे. टाळेबंदीमुळे जगणे खूपच अवघड झाले आहे. अंकुश तांदळे म्हणाले, खडी फोडून आम्ही आमचे कुटुंब चालवतो. दिवसाला ४०० रुपये मिळतात. पण, हे उत्पन्न टाळेबंदी जाहीर झाल्यापासून पूर्णपणे बंद झाले आहे. इतर घरखर्चाबरोबरच आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्च कसा भागवायचा, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. सरकारने गरिबांचा, मजुरांचा, हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा, असे माझे सरकारला सांगणे आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com