'त्या' रकमेचा व्यवहार बॅंकिंग नियमानुसारच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

बीड - 'मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेली दहा कोटी रुपयांची रक्कम बॅंकिंग व्यवहारानुसारच आहे,' असे स्पष्टीकरण वैद्यनाथ बॅंकेचे सरव्यवस्थापक विनोद खर्चे यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले. गुरुवारी (ता. 15) चेंबूरमधील (मुंबई) छेडानगर जंक्‍शनजवळ एका वाहनातून दहा कोटी रुपयांची ही रक्कम ताब्यात घेतली होती.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे बॅंकेच्या संचालक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ बॅंकेच्या घाटकोपर शाखेची दहा कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतल्याने याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, याबाबत बॅंकेने आज खुलासा केला. केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून त्या नोटा बॅंकेत जमा कराव्यात, असे आवाहन केले होते. त्यानुसार वैद्यनाथ बॅंकेची ही रक्कम विविध शाखांमध्ये असलेल्या ग्राहकांकडून जमा झाली असल्याचे म्हटले आहे. परळी वैजनाथ व शाखांच्या परिसरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ही रक्कम जमा करून घेण्यास असमर्थता दर्शविली, त्यामुळे बॅंकेने परळी येथून 17 नोव्हेंबर रोजी 25 कोटी रक्कम मुंबई येथील अन्य बॅंकांच्या खात्यांमध्ये जमा करण्यासाठी घाटकोपर येथील शाखेत पाठवली होती. या रकमेचा विमा (ट्रांझिट इन्शुरन्स) उतरविण्यात आला असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: vaidyanath bank currency declaration