'वैद्यनाथ'च्या नोटांची चौकशी करा - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

बीड - मुंबईत पकडलेल्या वैद्यनाथ बॅंकेच्या 10 कोटी रुपयांच्या नोटा बॅंकेच्याच आहेत की बॅंकेच्या नावाखाली संचालक मंडळाच्या, असा प्रश्‍न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. शिवाय या नोटांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंडे म्हणाले, की वैद्यनाथ बॅंकेचे दहा कोटी रुपये मुंबईत पकडण्यात आले. बॅंकेची मुख्य शाखा परळी वैजनाथ (जि. बीड) येथे असताना एवढी मोठी रक्कम मुंबईला नेण्याचे कारण काय? बॅंकांची रक्कम बॅंकेच्या वाहनातून नेण्याऐवजी ती खासगी गाडीतून नेण्याचे प्रयोजन काय? एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना सुरक्षारक्षकाची गरज का भासली नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. पकडण्यात आलेली रक्कम वैद्यनाथ बॅंकेची होती की, अध्यक्ष-संचालकांची, असा सवाल उपस्थित करतानाच या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात बॅंकेच्या सामान्य कर्मचाऱ्यांचा बळी दिला जाण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: vaidyanath bank currency inquiry