वैजापूर : घरफोडीतील 24 लाखांचा ऐवज जप्त; एकाला अटक, एक आरोपी फरार

Vaijapur
Vaijapur

औरंगाबाद : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत वैजापूर येथे काल (ता.14) दुपारी घरफोडी झाली. त्या घरफोडीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोविस तासात तपास लावत 71 तोळे सोने, 800 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह एकूण 24 लाखांचा ऐवज चोरट्यांकडून हस्तगत केला.

घरफोडीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक गणेश गावडे यांनी दिली. किशोर वायाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आकाश प्रकाश पवार (वय 38, रा. मेरी. ता. चिखली जि. बुलडाणा) असे फरार आरोपीचे नाव आहे.

प्रकाश लालचंद छाजेड (रा. मर्चंड कॉलनी, गणपती मंदिरासमोर, वैजापूर) यांचा भाऊ ऋषभ छाजेड त्यांच्या शेजारी आईसह राहतो. ऋषभ पत्नीसह पुणे येथे कामानिमित्त गेलेले होते. गुरुवारी (ता. 13) सकाळी अकरा वाजता त्यांची आई मानकवर या प्रकाश यांच्याकडे घराला कुलूप लाऊन गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याचे समोर आल्याने त्यांनी 24 लाखांचा एवज चोरी गेल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळी उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांच्या पथकाचे पाचारण केले. दुलत यांनी सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा तपास सुरु केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा किशोर वायाळने केल्याचे त्यांना कळाले. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा ते दुसरबीड रस्त्यावर साफळा रचुन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच किशोर वायाळने आकाश प्रकाश पवार (वय 38, रा. मेरी. ता. चिखली जि. बुलडाणा) याच्या मतदीने गुन्हाची कबुली दिली. किशोरकडून 71 तोळे सोने व 795 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख असा 24 लाखांचा एवज पोलिसांनी हस्तगत केल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक गावडे यांनी सांगितले. 
 
सव्वा महिन्यापूर्वीच सुटला होता जामीनावर 
आरोपी किशोर वायाळवर औरंगाबाद शहर, ग्रामीण, अमरावती, वाशीम, अकोला, सोलापूर, जालना, बुलडाणा जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर, गुजरातमध्ये सुरत येथे घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो नुकताच 24 एप्रिलला जामीनावर सुटला असल्याचेही गावडे म्हणाले. दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीचा 24 तासात तपास लागल्याचेही ते म्हणाले. ही कामगिरी दुलत यांच्यासह गफार पठाण, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, किरण गोरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, योगेश दारवंटे संजय तादळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com