वैजापूर विधानसभा ः डॉ. परदेशी, एकनाथ जाधवांसह सात जणांची माघार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

वैजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातून
भाजपचे डॉ. दिनेश परदेशी आणि जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोमवारी (ता. सात) माघार घेतली. आता सात पक्षीय, नऊ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर, शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांच्यासह अपक्ष अकील शेख यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः वैजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातून
भाजपचे डॉ. दिनेश परदेशी आणि जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोमवारी (ता. सात) माघार घेतली. आता सात पक्षीय, नऊ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर, शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांच्यासह
अपक्ष अकील शेख यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

पुतण्यासाठी भाऊसाहेब चिकटगावकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. शिवसेनेचे रमेश बोरनारे यांचे आव्हान अभय चिकटगावकर यांच्यासमोर आहे. आमदार आर. एम. वाणी यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात बोरनारे यांना यश आले आहे.

त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर उमेदवार अकील शेख रिंगणात आहेत. नऊ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अर्ज परत घेतलेल्या उमेदवारांची नावे अशी ः विजया डोंगरे, अविनाश गलांडे, चंद्रकांत कटारे, एकनाथ जाधव, जे. के. जाधव, डॉ. दिनेश परदेशी, दशरथ बनकर. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार असे. अभय पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), रमेश बोरनारे (शिवसेना), बाबासाहेब पगारे (बसपा), संतोष जाधव (मनसे), प्रमोद नांगरे (वंचित बहुजन आघाडी), सीताराम उगले (स्वतंत्र भारत पक्ष), ज्ञानेश्वर घोडके (प्रहार), अपक्ष उमेदवार ः अकील शेख, अरविंद पवार, अशोक बागूल, कचरू पवार, डॉ. राजीव डोंगरे, एल. एम. पवार, माधवराव पैठणे, विश्‍वास पाटील, संतोष तागड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaijapur : Pardeshi, Jadhav Other Seven Withdrawn Nomination