वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुन्हे जलदगती न्यायालयात चालविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला अज्ञातांनी कंपन्यांची केलेली तोडफोड व जाळपोळ प्रकरणातील गुन्हे जलदगती न्यायालयात चालविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली.

नऊ ऑगस्टला मराठा आरक्षणादरम्यान औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीत जमावाने पोलिस व्हॅनसह 25 ते 30 खासगी वाहनांची तोडफोड करून त्यांपैकी काही वाहने पेटविली होती. सुमारे 100 ते 125 कंपन्यांत तोडफोड करून जाळपोळही केली. या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे जलदगती न्यायालयात चालविण्यात येतील. दंगल व त्यासारख्या प्रकरणात संबंध असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित लोकांची गय केली जाणार नाही. पोलिसांकडून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्या सोडविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले...
- ग्रामीण व शहर पोलिस हद्दीत कन्व्हेक्‍शनचे प्रमाण वाढले.
- मोठ्या गुन्ह्यांसोबतच छोट्या गुन्ह्यांकडेही लक्ष द्या.
- सामान्यांशी निगडित गुन्ह्यांत सजगता बाळगून काम करा.
- मोबाईल, दुचाकी चोऱ्यांची उकल करून सामान्यांना मुद्देमाल परत करा.

Web Title: Valuj Industrial crime speed court devendra fadnavis