वालूर शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

संजय मुंडे
रविवार, 29 एप्रिल 2018

वालुर येथील रहिवासी सुनिल सर्जेराव पांजगे यांचा कामांसाठी असलेल्या विट भट्टीजवळच्या विहिरीत रविवारी (ता.२९) मृतदेह सापडला असून, उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला.

वालूर : वालुर येथील रहिवासी सुनिल सर्जेराव पांजगे यांचा कामांसाठी असलेल्या विट भट्टीजवळच्या विहिरीत रविवारी (ता.२९) मृतदेह सापडला असून, उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला.

पांजगे यांच्या मृत्यूची अद्याप पोलिसात नोंद झाली नसल्याचे वालूर पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. चवरे यांनी दिली. पांजगे यांचा वालूर शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडली आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Web Title: Valur Water Storage one person found dead

टॅग्स