व्हॅनच्या चालकाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

अपघात
अपघात

अजिंठा (जि.औरंगाबाद ) ः ट्रकच्या धडकेने ओम्नी व्हॅनच्या चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.14) दुपारी अडीचच्या सुमारास अजिंठा-सिल्लोड महामार्गावर पानस (ता. सिल्लोड) येथे घडली.अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी सांगितले, ""ट्रक (एमएच- 16, एई-9897) चे चाक डोक्‍यावरून गेल्याने ओम्नी व्हॅन (एमएच- 06, एएस-3642) चा चालक अब्दुल अजीज शेख अहेमद, रा. भोकरदन हल्ली मुक्काम पालोद (ता. सिल्लोड) याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी ट्रकचालक नवनाथ भागाजी साखळे (वय 40 ) रा, लिहाखेडी (ता. सिल्लोड) हल्ली मुक्काम फुलंब्री यास ताब्यात घेतले.'' दरम्यान, शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या वाहनचालकांमध्ये बाळापूर गावानजीक वाद झाल्याची चर्चा परिसरात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com