डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्रीत विविध कार्यक्रम

नवनाथ इधाटे
गुरुवार, 19 जुलै 2018

फुलंब्री विधानसभा मतदार संघातील माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.19) रोजी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाभर विविध कार्यक्रम अर्य्क्रामाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदार संघातील माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.19) रोजी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाभर विविध कार्यक्रम अर्य्क्रामाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

तालुक्यातील ओएसिस इंग्रजी शाळेत डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान केलेल्याना डॉ. काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. फुलंब्री येथील टी पॉइंटवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. बाजार समिती मध्ये डॉ.कल्याण काळे यांचे आगमन होताच फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी देवगिरी कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, बाजार समितीचे सभापती तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रंगनाथ कोलते, अजगर पटेल, रउफ कुरेशी, सुभाषराव गायकवाड, शेख रज्जाक, लहू मानकापे, पंढरीनाथ जाधव, कचरू मैंद, मुतेश्वर जाधव, कारभारी वाहाटूळे, वरुण पाथ्रीकर, मुदस्सर पटेल, इलियास पटेल, गणेश काळे, अंबादास गायके, साहेबराव इधाटे, नथ्थू इधाटे, सुरेश इधाटे, सुरेश फुके, गजानन इधाटे, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Web Title: Various events on Dr. Kalyan Kales birthday