Vasantrao-Naik-Chowk
Vasantrao-Naik-Chowk

इन-आऊट एकच, वाहतुकीचा उडतो फज्जा!

या आहेत समस्या
 चौकास चारही बाजूंनी रिक्षांनी घेरले
 पोलिसांकडून रिक्षांवर कारवाईचा अभाव
 सिग्नल सुटण्यापूर्वीच वाहनांची धावाधाव
 सर्व्हिस रस्त्यावरून येतात राँगसाईड वाहने
 सिग्नल वेळी-अवेळी बंद पडतात
 वाहतूक नियमनापेक्षा दंडवसुली जास्त
 उड्डाणपुलाखालील एकाच बाजूच्या रस्त्याचा वापर
 दुसरा वे बिनकामाचा, वाहतुकीस अयोग्य
 चौकातून जाताना उडतो वाहनधारकांचा गोंधळ
 वळण घेताना समोरून येणाऱ्या वाहनांमुळे अपघात
 मुख्य रस्ता सर्व्हिस रस्त्यात परिवर्तित केला.
 सर्व्हिस रस्त्याहून राँगसाईड वाहने ऐन चौकात येतात.
 नियमांचा सातत्याने भंग, परिणामी चौकात कोंडी 
 झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे गायब. नियमन नाही

हे आहेत उपाय
 चौकात रिक्षा लावण्यास कायमचा मज्जाव करावा.
 वाहतूक नियमनासाठी रिक्षा स्टॅंड चौकापासून दूर हवे.
 सिग्नल यंत्रणेत सिंक्रोनाईज पद्धतीचा प्रयोग करावा.
 चौकाच्या रचनेत दुरुस्ती करता येईल.
 उड्डाणपुलाखालील दोन वेला इन-आऊटचे फलक लावावेत.
 व्यस्त चौकात दंडवसुलीपेक्षा नियमनावर अधिक भर द्यावा.
 झेब्रा क्रॉसिंग व इतर दिशादर्शक मार्किंग करावे. 

अंदाजच येत नाही
एपीआय कॉर्नर येथून जालना रस्त्याकडून येताना जळगाव रस्त्याकडे वळण्यासाठी मोठी समस्या उद्‌भवते. उड्डाणपुलाखाली दोन मार्ग असून सिडको बसस्थानक सर्व्हिस रस्त्याकडून वाहने या मार्गातून येतात. दोनही मार्गात इन कोणते व आऊट कोणते याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. तसा सूचना फलकही नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com