शेतकऱ्यांसाठी एकत्र या - आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

वसमत - तरुणांनी जात आणि पक्षासाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी रस्‍त्‍यावर आले पाहिजे. आता शेतकऱ्यांचा कट्टरतावाद आणण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच या देशात या पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवलंय तेच पाप भाजप सरकारनेसुद्धा केले, अशी टीका आमदार बच्चू कडू यानी वसमतमध्ये राजे संभाजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक पिके बदलून पहिले, तसे सरकारही बदलून पहिले पण शेतकऱ्याच्या पदरी निराशाच झाली, रामदेव बाबाचे औषध जर परदेशात जाऊ शकतात तर आमच्या शेतकऱ्यांसाठी तुरीच्या भावासाठी शेती उत्पादन परदेशात जाण्यासाठी कर बदलले पाहिजे.

वसमत - तरुणांनी जात आणि पक्षासाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी रस्‍त्‍यावर आले पाहिजे. आता शेतकऱ्यांचा कट्टरतावाद आणण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच या देशात या पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवलंय तेच पाप भाजप सरकारनेसुद्धा केले, अशी टीका आमदार बच्चू कडू यानी वसमतमध्ये राजे संभाजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक पिके बदलून पहिले, तसे सरकारही बदलून पहिले पण शेतकऱ्याच्या पदरी निराशाच झाली, रामदेव बाबाचे औषध जर परदेशात जाऊ शकतात तर आमच्या शेतकऱ्यांसाठी तुरीच्या भावासाठी शेती उत्पादन परदेशात जाण्यासाठी कर बदलले पाहिजे. खाणाऱ्याचा विचार केला पिकवणाऱ्याचा विचार केला नाही. आमची पोरं जातीसाठी अन् अनेक पक्षांच्या नेत्यांसाठी मरतात. तिच पोरं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आली पाहिजेत. तसेच येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात राजे संभाजी जयंती उत्‍सव समितीतर्फे आमदार कडू यांच्‍या उपस्‍थितीत जयंती सोहळा साजरा झाला.

या सरकारमधला रावसाहेब दानवे हे ज्या दिवशी मला भेटतील त्याच दिवशी त्यांचे तोंड मी लाल केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या देशात धर्माचा कट्टरता वाद आम्ही पहिला, जातीचा कट्टरता वाद आम्ही पहिला आता सरकारला शेतकऱ्याचा कट्टरता वाद ही पाहावा लागेल अशी टीका त्‍यांनी केली. वीस लाख टन तूर आयात करत केंद्र शासनाने दुसरीकडे निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या मालाची दुरवस्‍था झाली.

रामदेवबाबांची औषधे परदेशात जातात तर शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर परदेशात का जात नाही याचा विचार केला पाहिजे, अशीही टीका त्‍यांनी केली. तसेच येत्या 30 तारखेला आंदोलन जाहिर करणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी डॉ. काळे नागनाथ, प्रा. रामभाऊ मुटकुळे, युवा नेते सचिन भोसले आदी उपस्‍थित होते. गजानन पडोळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: vasmat marathwada news jointly for farmer