‘दादा, मामा, तात्यां’वर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

बीड - शहरात अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर असून आता या वाहनधारकांवर पोलिस प्रशासनाने जास्त लक्ष केंद्रित केले असून यापुढे व्हीआयपी नंबर टाकणाऱ्या दुकानदारांवर व वाहनधारकांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

बीड - शहरात अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर असून आता या वाहनधारकांवर पोलिस प्रशासनाने जास्त लक्ष केंद्रित केले असून यापुढे व्हीआयपी नंबर टाकणाऱ्या दुकानदारांवर व वाहनधारकांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

शहरातील अनेक वाहनांवर नियमांच्या पलीकडे जाऊन फॅन्सी नंबर टाकण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही वाहने प्रतिष्ठित नागरिकांची आहेत. तर काही वाहने सर्वसामन्यांची आहेत. अनेक वेळा चोरटे अशी वाहने चोऱ्या करण्यासाठी वापरतात. यामुळे ज्या वेळेस चोरीच्या ठिकाणी असे वाहने असतात, त्या वेळी या वाहनांचा नंबर ओळखण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे आता पोलिस प्रशासनाने अशा वाहनांवर व ज्या दुकानात हा नंबर टाकण्यात आला आहे त्यांच्यावर कार्यवाईचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील दादा, मामा, तात्या, काका असे नंबर वाहनांवर टाकणाऱ्या वाहनधारकांना हे नंबर काढून नियमानुसार नंबर टाकावे लागणार आहेत.

पोलिसांनी मंगळवारी येथील नंबर टाकणाऱ्या दुकानदारांची बैठक घेतली व यांची माहिती दिली.‘‘सध्या शहरातील ज्या अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर टाकले आहेत. त्यांनी हे नंबर बदलून नियमाप्रमाणे नंबर टाकावे, यासह प्लेटचा वापर फक्त नंबर टाकण्यासाठीच करावा. या संदर्भात आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. येथून पुढे ज्या वाहनांवर फॅन्सी नंबर असेल त्या वाहनांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील.   
- सुधीर खिरडकर, पोलिस उपअधीक्षक

Web Title: vehicle fancy number plate crime