सव्वाशे वाहन परवाने खोळंबले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

तांत्रिक अडचणीने उमेदवारासह अधिकारी कर्मचारीही त्रस्त

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ परवाना देण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र बदलण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाईन परीक्षा पास होऊन तब्बल एक महिना उलटला तरी जवळपास सव्वाशे वाहनधारकांना शिकाऊ परवाना मिळालेला नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून एक महिन्यापासून नव्या ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ परवाने दिले जात आहेत; मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत सुरवातीपासूनच कागदपत्रे अपलोड, स्कॅन व अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. यावर मात करून उमेदवारांनी परीक्षा पास केल्यावर त्याला लगेच शिकाऊ परवाना देणे अपेक्षित आहे;

मात्र ऑनलाईन प्रक्रियेतील वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे गेल्या महिन्याभरापासून तब्बल सव्वाशे शिकाऊ परवाने वितरित करता आले नाहीत. त्यामुळे उमेदवार दररोज परिवहन कार्यालयात चकरा मारत आहेत. परवाने मिळत नसल्याने उमेदवार दररोज चकरा मारत असल्याने परिवहन कर्मचारी उत्तरे देताना त्रस्त झाले आहेत आणि उमेदवारांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: vehicle licenses pending

टॅग्स