वाहनांना ‘वॉन्टेड’मधून काढण्यास टाळाटाळ

Vehicle
Vehicle

औरंगाबाद - परिवहन कार्यालयाने कारवाई केलेल्या वाहनांना वॉन्टेडमध्ये टाकले जाते; मात्र दंड भरल्यानंतर वाहन वॉन्टेडमधून काढणे अपेक्षित आहे. तरीही महिना-महिना वाहनधारकांना चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे. खटला विभागाच्या मनमानी कारभाराने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. 

आरटीओ कार्यालयातर्फे मोटार वाहन अधिनियमान्वये रस्त्यावरील विविध वाहनांच्या विरोधात कारवाई केली जाते. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, मालवाहू वाहने, त्याचप्रमाणे विविध श्रेणीतील खासगी वाहनांवर विविध कलमान्वये भरारी पथके रोज कारवाई करीत असतात. रस्त्यावर आरटीओ निरीक्षक किंवा भरारी पथकांनी वाहन पकडून कारवाई केल्यानंतर त्या वाहनांना दंडात्मक रक्कम भरेपर्यंत संगणकीय सिस्टीममध्ये सदर वाहन ‘वॉन्टेड’मध्ये टाकले जाते. दंडात्मक रक्कम भरल्याशिवाय या वाहनाच्या खरेदी-विक्रीचा कुठलाही व्यवहार होत नाही; मात्र संबंधित वाहनमालकाने दंडात्मक रक्‍कम भरल्यानंतर ते वाहन लगेचच वॉन्टेडमधून काढणे अपेक्षित आहे. 

त्रास देण्याचे धोरण 
दंडात्मक रक्कम भरल्यानंतरही वाहन वॉन्टेडमधून काढण्यासाठी खटला विभागात कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. दंडात्मक रक्कम भरल्यानंतर अनेक दिवस वाहन वॉन्टेडमधून काढले जात नाही. पाठपुरावा करण्यासाठी आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनमालकाला उलट प्रश्‍न केले जातात. पैसे भरल्याची पावती कुठे आहे, ती खरी आहे का, पैसे केव्हा भरले, तसेच पैसे भरले त्याचवेळी वाहन वॉन्टेडमधून का निघाले नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न विचारून त्रास दिला जात आहे. 

कार्यवाहीची तत्परता आवश्‍यक
आरटीओ कार्यालयाच्या खटला विभागात दिवसभरात किती जणांनी दंडात्मक रक्कम भरली, हे लक्षात घेऊन सायंकाळी सर्व वाहने वॉन्टेडमधून बाहेर काढणे अपेक्षित असते. उलट त्याच दिवशी तर वाहन वॉन्टेडमधून काढले जात नाही. वाहनधारक दुसऱ्यांदा कार्यालयात आल्याशिवाय ही कारवाई होतच नाही. कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com