ज्येष्ठ अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

लातूर - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्रीराम गोजमगुंडे (वय 72) यांचे गुरुवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर दुपारी बाभळगाव रस्त्यावरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अभिनय व चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील मराठवाड्यातील पहिली व्यक्ती म्हणून श्रीराम गोजमगुंडे यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. हौशी रंगभूमीची कलोपासक व रसबहार ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्षे सेवा केली. "शेवंता जित्ती हाय', "भिरभिरतं पाखरू', "फास', "पुन्हा पुन्हा मोहोंजो दारो', "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी', अशी त्यांची नाटके गाजली. 1974 मध्ये "राजा शिवछत्रपती' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1980 मध्ये लातूर आणि परिसरात चित्रीत केलेल्या "झटपट करू दे खटपट' या मराठी चित्रपटाचे ते निर्माता-दिग्दर्शक होते. 

Web Title: Veteran actor Shriram gojamagunde dies