पशुवैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संप; तीन दिवसापासून कामकाज बंद

Veterinary college students are doning agitation from last three working days
Veterinary college students are doning agitation from last three working days

परभणी : राज्यातील पशुसंवर्धन विभागाने 125 सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचा निषेध राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. परभणीसह राज्यातील पाच महाविद्यालयात हे आंदोलन सुरु असून यामध्ये महाविद्यालय प्रशासन देखील सहभागी झाले असल्याने तीन दिवसांपासून कामकाज ठप्प पडले आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने 11 मार्चला. गट 'क' अंतर्गत येणाऱ्या 125 सहायक पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती करत पशुधन विकास अधिकारी गट 'ब' या पदावर बढती दिली. दहावी नंतर डिल्पोमा अर्थात पदविका अभ्यासक्रम पूर्ण (एलएसएस) करणाऱ्या सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना चक्क पशुधन विकास या वर्ग एक पदावर पदोन्नती पशुवैद्यक डॉक्टर बनवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अवैधरित्या दिलेली पदोन्नती मागे घेण्यात यावी, पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, 1984 च्या पशुवैद्यक कायद्याची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटना कृती समितीच्या नेतृत्त्वात परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय, अकोला, मुंबई, उदगीर, शिरवळ येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन  सुरु केल्याने महाविद्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. परभणीच्या आंदोलनात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय हे देखील सहभागी झाले आहेत. शासनाने आचारसंहितेचा भंग करत पशुसंवर्धन 
विभागातील पदभरतीची जाहीरात काढली असून पशुधनाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com