पशुवैद्यकीय दवाखाना फोडला ; चोरट्यांचा धुमाकूळ

कृष्णा पिंगळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोनपेठ :  सोनपेठ शहरालगत असणाऱ्या शेळगाव रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाना मंगळवारी मध्यरात्री चोरट्यानी फोडला. दवाखान्यातील कपाटे फोडून सामानाची नासधूस केली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी भोसले हे दवाखान्यात आले असता त्यांना दवाखान्याचे दरवाजे तोडल्याचे दिसून आले. 

यामध्ये दवाखान्यातील विशेष काही चोरी झाली नसली तरी चोरट्यानी दवाखान्यात नासधूस करून शस्त्रक्रिया करण्याचे अवजारे चोरून नेली. यावेळी अत्यंत महागाची आणि महत्वाची सोनोग्राफी मशीन मात्र चोरट्यांनी जागेवरच सोडली. 
सोनपेठ शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून यावर नियंत्रण मिळवण्यास सोनपेठ शहर पोलीस पूर्णपणे अपयशी ठरली आहे. काही वर्षांपूर्वी याच पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील बुरांडे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीचा छडा सोनपेठ पोलिसांना अद्यापपर्यंत लागलेला नाही. अशा भुरट्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

पीकविमा उचलण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल व पाकिटांवर चोरट्यानी डल्ला मारला. या डल्ला मारण्याच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. पोलिसांनी या भुरट्या चोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

Web Title: The veterinary hospital theft