पीडित महिलेलाच खंडणीच्या आरोपाखाली अटक

तानाजी जाधवर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करणार्‍या पीडित शिक्षिकेला खंडणीच्या गुन्ह्यात उस्मानाबाद शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती.

रविवारी (ता. 25) या महिलेला जिल्हा न्यायालयात हजर केले तेव्हा बुधवारपर्यंत (ता. 29)  पोलिस कोठडी सुनावली आहे. या अगोदर यातील मुख्य संशयित राहुल नलावडे याला पोलिस कोठडीनंतर जामीन मंजुर झाला आहे. शिक्षणाधिकारी जगताप यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करुन महिलेवर काही दिवसातच खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेंव्हापासून ही महिला फरारी होती.

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यातील सात लाख रुपये राहुल नलावडे याने घेतल्याची तक्रार शिक्षणाधिकारी जगताप यांच्या पत्नी उषा जगताप यांनी शहर पोलिसांत दिली होती.  याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  पोलिसांनी दोन महिन्यांपासून फरारी असलेल्या महिलेला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेऊन अटक केली. आज न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: victim arrested for extortion