चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करुन स्वतः केला आत्महत्येचा प्रयत्न

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

चरित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचा दगड टाकून खून करून स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथे घडली असून या थरारक घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस खुनाच्या गुन्ह्यात वाढ होऊन ही खुनाचा तपास लावण्यास स्थानिक पोलिसांना येत असलेले अपयश पाहून पोलिसाच्या कार्यपध्द्ती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

परभणी- चरित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचा दगड टाकून खून करून स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथे घडली असून या थरारक घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस खुनाच्या गुन्ह्यात वाढ होऊन ही खुनाचा तपास लावण्यास स्थानिक पोलिसांना येत असलेले अपयश पाहून पोलिसाच्या कार्यपध्द्ती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत, अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील मौजे कानाडखेड येथील राहणारे लक्ष्मण काशिनाथ चांडाळ हा आपल्या पत्नी कांचन लक्ष्मण चांडाळ वय (25 वर्षे) हिच्या चारित्र्यवर नेहमी संशय घ्यायचा, सतत त्रास देत असल्याने दोघा पती पत्नीचे दररोज वाद होत होते. त्यामुळे, लक्ष्मण चांडाळ याने आपली पत्नी कांचन हिच्यावर राग धरून मध्य रात्री झोपेत असताना डोक्यात दगड टाकून तिचा खून केला व स्वतः विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सदर घटनेची खबर मिळताच पूर्णा पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण कर्डीले, पो.नि. सुनिल ओव्हाळ, पो.उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पो.कॉं समीर पठाण, कलवले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मयत कांचन चांडाळ चे मामा गणयानोबा जनार्धन काशीद यांच्या फिर्यादी वरून पूर्णा पोलिस ठाण्यात पती लक्ष्मण चांडाळ यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पती लक्ष्मण चांडाळ यांनी विषारी औषध पाषाण केल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे करत आहेत.

Web Title: The victim tried to commit suicide by murdering his wife