Video - नांदेडात तृतीयपंथियांकडून अन्नदान 

फोटो
फोटो

नांदेड : तृतीयपंथी व कमल फाऊंडेशनच्या वतीने शहराच्या विविध भागात अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी तृतीयपंथीयांचे गुरू गौरी देवकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन गोरगरीब वस्तीत अन्नदान वाटप केले. विशेष म्हणजे हा समाज समाजाने नाकारलेला असतानाही त्यांच्यातील माणुसकी पाझर फुटला आणि या संकटकाळी ते गोर- गरीबांच्या मदतीला धावून आले. लॉकडाऊनमुळे अनेकांचे काम व चुल बंद असल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड येथील सांगवी आसना बायपास येथून जाणारे मालवाहू ट्रक व पायपीट करत नागरिक आपआपल्या गावी जात आहेत. त्यातील अनेक जण उपाशी पोटी व रस्त्यात ज्यांनी मदत केली त्यांच्या बळावर आपले गाव गाठत आहेत. त्यांच्यासाठी तृतीयपंथीय व कमल फाउंडेशनच्या वतीने अन्नदान, नाष्टा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

तृतीयपंथी गौरी देवकरचा पुढाकार

येणाऱ्या जाणाऱ्याला पोटभर जेवन देत या तृतीयपंथियांनी समाजाच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या तृतीयपंथियांचे पोट आठवडी बाजार, रेल्वे, जत्रा या ठिकाणी भिक्षा मागून मिळेल त्या उत्पन्नावर असते. मात्र संकटकाळी त्यांनी लोकांना समोर येऊन मदत केली.
यावेळी गौरी देवकर, प्रिया देवकर, पुनम देवकर, नुतन बकश, सपना बकश, सोनी बकश, संतोषी बकश, कमल फाऊंडेशनचे अमरदीप गोधने उपस्थित होते.

मॉ संतोषी मुलींचे वसतीगहाकडून खिचडी वाटप 

नांदेड : श्रीनगर येथील मॉ संतोषी मुलींचे वसतीगृहाच्या संचालिका जयश्री जैस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पाच दिवसापासून शहरातील गरीब वस्तीत जावून खिचडी वाटप सुरू केले आहे. त्या दररोज एक क्विंटल तांदळाची खिचडी ता. सहा एप्रीलपर्यंत वाटप करणार आहेत. 

घरात बसुन लॉकडाऊन पाळा

शहराच्या रामनगर, गौत्तमनगर सांगवी येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुर वस्तीत जावून त्यांना धीर देत घराबाहेर पडू नका, आम्ही आपल्या मदतीला तयार आहोत. शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या चुलीसुद्धा पेटत नाहीत. या मजुर वर्गाची उपासमार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला श्रीमती जैस्वाल यांनी प्रतिसाद देत गोरगरिबांच्या तोंडी घास सोशल डीस्टंसींगचे नियम पाळून भरवित आहेत.

हे घेत आहेत परिश्रम

यावेळी जयश्री जैस्वाल, चंदा रावळकर, नाजिया पठाण, गौरव आनासाने, कृष्णा धनंजय उमरीकर, माधवराव देशमुख, गोविंदराव देशमुख, राजेश पहूजा, श्री. लोहीया हे सर्वजम परिश्रम घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com