video- हिंगोलीत रामकथेनिमित्त भव्य शोभायात्रा  

video- हिंगोलीत रामकथेनिमित्त भव्य शोभायात्रा  

हिंगोली : येथील तापडिया इस्‍टेट भागात शनिवारपासून (ता.१८) श्रीरामकथेस सुरवात झाली आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात महिला भाविक डोक्‍यावर कलश घेवून सहभागी झाल्या. या वेळी हनुमानाची भव्य मूर्ती शोभायात्रेचे आकर्षण ठरली होती. यात्रेत भजनी मंडळ देखील सहभागी झाले होते. 

येथील तापडिया इस्‍टेटमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात रामकथेचे वाचन मुरलीधर महाराज करणार आहेत. यानिमित्त सकाळी नऊ वाजता संकटमोचन हनुमान मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यात बाल भजनी मंडळ तसेच महिला डोक्‍यावर कलश घेवून सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेच्या समोर भव्य हनुमानाची बसलेली मूर्ती एका वाहनावर ठेवण्यात आली होती. ही मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती. टाळ मृदंगासह ढोलताशाच्या गजरात मान्यवरांच्या उपस्‍थितीत शोभायात्रेला सुरवात झाली. 

रामायणातील विविध प्रसंग

ही शोभायात्रा गांधी चौक, इंदिरा चौक, अग्रसेन चौक व त्‍यानंतर तापडिया इस्‍टेटमध्ये पोचली. त्‍यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. तापडिया इस्‍टेटमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. त्‍यानंतर मुरलीधर महाराज यांच्या उपस्थितीत रामकथेला प्रारंभ झाला. रामकथेचे यजमान गोपालदास अग्रवाल होते. रविवारपर्यंत (ता.२६) दररोज सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. यात रामायणातील विविध प्रसंग दाखविण्यात येणार आहेत.

भगवान परशुराम संवादाचा प्रसंग

दरम्यान, रविवारी (ता.१९) रामकथेत सती चरित्र व विवाहाचा प्रसंग होणार आहे. या कार्यक्रमाचे यजमान एम. टी. वर्मा आहेत. सोमवारी (ता.२०) श्रीराम जन्मोत्‍सवाचा कार्यक्रम होणार असून त्‍याचे यजमान रमेशलाल जयस्‍वाल आहेत. मंगळवारी (ता.२१) बाललिला प्रसंग असून याचे यजमान प्रशांत निलावार आहेत. बुधवारी (ता.२२) भगवान परशुराम संवादाचा प्रसंग असून त्‍याचे यजमान राजेश बियाणी आहेत. 
गुरुवारी (ता.२३) श्रीराम सीताविवाह प्रसंग असून ओमप्रकाश हेडा हे यजमान आहेत. शुक्रवारी (ता.२४) केवट संवादाचा प्रसंग आहे. त्‍याचे यजमान दीपक निमोदीया आहेत.

रविवारी श्रीराम राज्याभिषेकाचा कार्यक्रम

शनिवारी (ता.२५) भरत भेटीचा कार्यक्रम होणार आहे. त्‍याचे यजमान कैलास अग्रवाल हे आहेत. रविवारी (ता.२६) श्रीराम, हनुमान भेट, लंकादहन व श्रीराम राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. त्‍याचे यजमान हनुमानदास अग्रवाल हे आहेत. दरम्यान, शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येंने भाविक सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील वातावरण धार्मिक झाले होते. आठ दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी भाविक पुढाकार घेत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com