विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे आज शहरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

औरंगाबाद - विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे हे शनिवारी (ता. आठ) सायंकाळी पाच वाजता औरंगाबादेत येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता आमखास मैदानात मसरत युनूस पटेल यांच्यातर्फे आयोजित मुस्लिम समाजातील 101 सामुदायिक विवाह सोहळ्यास ते उपस्थितीत राहणार आहे. रात्री साडेसात वाजता ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे यांच्या निवासस्थानी जातील. यानंतर रात्री साडेदहा वाजता सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करतील. रविवार (ता.नऊ) सकाळी 6.50 च्या विमानाने मुंबईकडे जातील.
Web Title: vidhan parishad dy. chairman manikrao thackeray in city