रमेश कराड यांच्यावरील अन्याय दूर केला - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

उस्मानाबाद - पक्षाचे निष्ठेने काम करूनही रमेश कराड यांना भाजपने उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये त्यांना प्रवेश देऊन उमेदवारी दिली. 

आघाडीसाठी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. आघाडी झाली अथवा झाली नाही तरी विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी (ता. २) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंडे म्हणाले, ‘भाजप विस्तारात कराड यांचे मोठे योगदान आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी लातूर जिल्ह्यात मोठे काम केले आहे. असे असतानाही भाजपने विधान परिषद उमेदवारीसाठी त्यांना डावलले. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना हा धक्का आहे. कराडांच्या प्रवेशाने लातूर जिल्ह्यासह तिन्ही जिल्ह्यांत राष्टवादीची ताकद वाढणार आहे. २०१४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यांचे आता पुन्हा ‘कमबॅक’ होत आहे’.

भाजपमधून राष्ट्रवादीत; लगेचच उमेदवारीही !
उस्मानाबाद - लातूर जिल्ह्यातील भाजपचे नेते रमेश कराड यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली. धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार अमरसिंह पंडित, राहुल मोटे, सतीश चव्हाण, लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जीवनराव गोरे, बसवराज पाटील नागराळकर, अक्षय मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते.

पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार कराड यांना प्रवेश देण्यात आल्याचे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. मुंडे यांनी भाजपच्या गल्ली ते दिल्लीच्या नेतृत्वावर निशाणा साधला.

भाजपमध्ये चौदा वर्षे काम करीत होतो. तेथे न्याय मिळत नसल्याने काही दिवसांपासून वैतागलो होतो. राष्ट्रवादीचा संस्थापक सदस्य असून मध्यंतरी रस्ता चुकला होता. आता चौदा वर्षांचा वनवास संपला. २०१९ मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. 
- रमेश कराड

Web Title: vidhan parishad election ramesh karad dhananjay mude politics