विधान परिषदेच्या मतदानामुळे चाकूरचे तहसील कार्यालय बंद

प्रशांत शेटे 
सोमवार, 21 मे 2018

चाकूर (लातूर) : लातूर - बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदान केंद्रामुळे तहसील कार्यालयात मतदाराव्यतिरीक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही, शासकीय सुट्टी जाहीर न करता कार्यालयात प्रवेश न देण्याच्या प्रशासनाच्या अजब कार्यपध्दतीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तालूक्यातील 25 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असून याचे मतदान केंद्र तहसील कार्यालयातील महसुल हाॅल मध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी (ता.21) सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाल्यापासून तहसील कार्यालयात मतदाराव्यतीरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

रविवारच्या सुट्टी नंतर ग्रामीण भागातील अनेकजण कामानिमीत्त तहसील कार्यालयात जात असताना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाकडून त्यांची अडवणुक केली जात होती. तहसील कार्यालयाच्या इमारतीत भूमिअभिलेख कार्यालय, कोषागार कार्यालय आहेत. शासकीय सुट्टी जाहीर न करता कार्यालयात प्रवेशासाठी मज्जाव केला जात असल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. 25 मतदारांसाठी तालूक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या प्रशासनाच्या या निर्णयामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात होती.

Web Title: for vidhan parishad voting closing of tehsil office