vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar statement harshvardhan jadhav kannad
vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar statement harshvardhan jadhav kannad

Vidhan Sabha 2019 : हर्षवर्धन जाधव सध्या कोणत्या पक्षात आहेत?; पवारांचा टोला 

कन्नड (औरंगाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे जाहीर सभा झाली. यासभेत पवार यांनी कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांची खिल्ली उडवली.

उपस्थितांमध्ये हशा
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष कोळी यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कन्नड येथे जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी भाजपच्या कलम 370च्या मुद्द्याची चीरफाड केली तसेच कन्नड तालुक्यातील रस्त्यांचा स्थानिक मुद्दा उचलून धरत, संतोष कोळी यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. कन्नडमध्ये मी येताना पाहिलं की, रस्त्यांचा प्रश्न खूप मोठा आहे. कन्नडची ओळखच आता खराब रस्ते, अशी झाली आहे, असे सांगताना पवार यांनी सध्या येथे आमदार कोण आहेत.? अशी विचारणा व्यासपीठावर केली. त्यावेळी हर्षवर्धन जाधव आहेत, असं उपस्थितांनी उत्तर दिलं. त्याचेवळी उपस्थितांमधून हशा पिकला. शरद पवार यांनी लगेचच 'सध्या कोणत्या पक्षात आहेत ते?' असे विचारून जाधव यांना टोला लगावला. त्यालाच पुढे धरून पवार म्हणाले, 'त्यांच्याविषयी फारसं बोलायचं काही कारण नाही. त्यांचे आई-वडील एकेकाळी माझ्यासोबत होते. माझ्या शब्दाखातर तुम्ही त्यांना निवडून दिले होते. आता आपल्याला संतोष कोळी यांना निवडून द्यायचंय. कोळी यांनी नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. त्यामुळेच मी त्यांना केवळ कन्नड शहरापुरतं न थांबता संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करा.'

कलम 370 हटविण्याला विरोध नव्हताच
महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरच्या कलम 370चा मुद्दा घुसडला जातोय. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले, 'काश्मीरमधील 370 कलम रद्द करताना काँग्रेस राष्ट्रवादीने विरोध केल्याचा चुकीचा प्रचार सध्या अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेसने विरोध केला नव्हता. केवळ काश्मीरमधील जनतेला विश्वासात घेण्याचा सल्ला सोनिया गांधींनी दिला होता. कारण, जर काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेतले नाही तर, शेजारी राष्ट्राला करुघोडी करण्याची संधी मिळेल, ती त्यांना देऊ नका. एवढीच त्या मागची भूमिका होती.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com