Vidhan Sabha 2019 : गंगाखेडकडे सगळ्यांचे लक्ष; शिवसेना-रासप मैत्रीपूर्ण लढत?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गंगाखेडमध्ये काय होणार?
जिल्ह्यातील सर्वांत लक्षवेधई गंगाखेड मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली असून शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे सेनेचे विशाल कदम, रासपचे डॉ. रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सिताराम घनदाट, सेनेचे माजी विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांच्या लढत रंगणार आहे.

परभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत गंगाखेडमध्ये पहायला मिळत आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघातून १२ उमेदवारांनी माघार घेतली असून, १५ जण रिंगणात आहेत. परंतु, काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने अधिकृत उमेदवार रविराज देशमुख यांना लढत अवघड जाणार आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, एमआयएमचे अली खान, वंचित बहूजन आघाडीचे मोहमंद गौस यांच्यात प्रमुख लढत आहे. तसेच जिंतूरमध्ये देखील शिवसेनेचे जिल्हा परिषद गटप्रमुख राम खराबे-पाटील यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे, वंचितचे मनोहर वाकळे यांच्यात लढत पाहवायस मिळेल. या मतदारसंघात १३ उमेदवार मैदानात आहेत. पाथरी मतदारसंघात सर्वांत कमी दहा उमेदवार रिंगणात असून, येथे भाजपचे आमदार मोहन फड, काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासह एमआयएम आणि वंचित आघाडीत मुख्य लढत होईल.

गंगाखेडमध्ये काय होणार?
जिल्ह्यातील सर्वांत लक्षवेधई गंगाखेड मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली असून शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे सेनेचे विशाल कदम, रासपचे डॉ. रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सिताराम घनदाट, सेनेचे माजी विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांच्या लढत रंगणार आहे. महायुतीत या मतदारसंघावर शिवसेने अधिकार सांगितला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मात्र, डॉ. गुट्टे यांच्यासाठी या मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. भाजपने जागा वाटपात अन्याय केल्याचे सांगण्यासाठी जानकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात रासप गंगाखेडची एकमेव जागा स्वतःच्या चिन्हावर लढेल, असे जानकर यांनी स्पष्ट केले. आम्ही राज्यात 287 मतदारसंघांमध्ये युतीला पाठिंबा देत आहेत. तर, शिवसेना-भाजपने एका मतदारसंघात आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मैत्रीपूर्ण लढत लढावी, अशी मागणी जानकर यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, अद्याप शिवसेनेकडून किंवा भाजपकडून या संदर्भात कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 parbhani district gangakhed shivsena rsp mahadev jankar