मराठवाड्यात मतमोजणी पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

उस्मानाबाद - विधानपरिषदेसाठी होत असलेल्या "उस्मानाबाद-लातूर-बीड' स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची गुरुवारी (ता. 24) होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून आज सायंकाळी पत्र आले असून, त्यात मतमोजणी पुढे ढकलली असून नवी तारीख लवकरच निश्‍चित करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामागचे नेमके कारण सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.
Web Title: vidhanparishad vote counting forward in marathwada