Vidhansabha 2019 : लातूरमधून अमित यांच्यासह धीरज देशमुख इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मंगळवारी (ता. ३०) मुलाखती झाल्या. विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघातून पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे सांगत मुलाखत दिली आहे. त्यांचे लहान बंधू, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी मुलाखत दिली.

लातूर - विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मंगळवारी (ता. ३०) मुलाखती झाल्या. विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघातून पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे सांगत मुलाखत दिली आहे. त्यांचे लहान बंधू, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी मुलाखत दिली. औसा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवू इच्छिणारे विद्यमान आमदार व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी मात्र मुलाखत प्रक्रियेला दांडी मारली.

पक्षाचे निरीक्षक, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये मुलाखती झाल्या. सहा मतदारसंघांसाठी एकूण २७ जणांनी मुलाखती दिल्या. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासह ताजुद्दीन वहेदअली सय्यद यांनी मुलाखत दिली आहे.  

लातूर ग्रामीणसाठी आमदार ॲड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुलाखत दिली आहे. याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख इच्छुक असून, त्यांनीही मुलाखत दिली. त्यांच्याशिवाय यास्मिन अब्दुल गणी शेख, रविकांत तांबारे हेही इच्छुक आहेत.  अहमदपूर मतदारसंघासाठी रामचंद्र मद्दे, शंकर गुटे, डॉ. गणेश कदम यांनी मुलाखती दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Latur Constituency Amit Deshmukh Dheeraj Deshmukh Politics