महायुतीकडून घटकपक्षांना १८ जागा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

दुष्काळाच्या उपाययोजना सुरू
राज्यातील २८ हजार गावांमध्ये शासन दुष्काळी उपाययोजना राबवीत आहे. त्याचबरोबर केंद्राने जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांमध्येही उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यात एक हजार ५०१ चारा छावण्या आहेत. यामध्ये १० लाख चार हजार ६८४ जनावरांना चारा, पाणी मुबलक मिळत आहे. केंद्र शासनाकडून प्रतिजनावर ७० रुपये, राज्य शासनाकडून ३० रुपये अशा प्रकारे प्रतिजनावर १०० रुपयांचे अनुदान छावणीमालकांना देण्यात येत आहे. राज्य शासनाला प्रतिदिवस सव्वादोन कोटी रुपये लागत आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा फॉर्म्युला असणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. दोन) माध्यमांना दिली.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मराठवाडा विकास मंडळातर्फे आयएमए सभागृहात राज्यातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका या विषयावर बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीला प्रबोधिनीचे संचालक, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, रंगनाथ कुलकर्णी, पोपटराव पवार, रवींद्र साठे, मनोज शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, ‘‘विधानसभेची तयारी सुरू झाली असून, यात महायुतीतील छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे. उर्वरित २७० पैकी १३५-१३५ जागांवर शिवसेना-भाजप युती समसमान जागांवर लढणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Mahayuti Seats Chandrakant Patil Politics