विधानसभेच्या तयारीला लागा - आंबेडकर

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

नांदेड - वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा जिंकून यश मिळविले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वच ठिकाणी दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आघाडीने आपली पकड मजबूत केली. आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले. 

लोकसभा निवडणुकीनंतर ॲड. आंबेडकर मंगळवारी (ता. चार) रात्री आठच्या सुमारास येथे आले. आज त्यांनी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. विधानसभेच्या प्रचाराची आखणी कशी असावी, याबद्दल त्यांनी म्हणणे ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक करून ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत करता आले. अनेक प्रस्थापितांना धक्का दिला. अनेकजण राजकीय प्रवाहाबाहेर पडले. अशीच ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा.’

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रा. यशपाल भिंगे, डॉ. संघरत्न कुऱ्हे, श्‍याम कांबळे, मोहन राठोड, फिरोज लाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com