Vidhansabha 2019 : ‘वंचित’कडे इच्छुकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४१ लाखांहून अधिक मते मिळविल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २१ ते २८ जुलैदरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत राज्यात ४१ लाखांहून अधिक मते मिळविल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २१ ते २८ जुलैदरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली. हा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Vanchit Bahujan Aghadi Interested Candidate Politics