विजय भटकर म्हणतायत, गांधींबरोबरच गोळवलकरांनाही गुरू माना

सुशांत सांगवे
Tuesday, 7 January 2020

लातूर : हे शक्य होईल का, हे माहिती नाही; पण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने एकत्र आले पाहीजे. महात्मा गांधींबरोबरच गोळवलकरांनाही गुरू मानायला हवे. एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करत देशाचा विकास साधला पाहीजे. अशा कामातूनच भारत पुढे विश्वगुरू होईल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

एकत्र येऊन काम करण्याचा चांगला पायंडा महाराष्ट्राने नुकताच घालून दिला आहे, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीचे कौतूकही केले.

लातूर : हे शक्य होईल का, हे माहिती नाही; पण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने एकत्र आले पाहीजे. महात्मा गांधींबरोबरच गोळवलकरांनाही गुरू मानायला हवे. एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करत देशाचा विकास साधला पाहीजे. अशा कामातूनच भारत पुढे विश्वगुरू होईल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

एकत्र येऊन काम करण्याचा चांगला पायंडा महाराष्ट्राने नुकताच घालून दिला आहे, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीचे कौतूकही केले.

Image result for vijay bhatkar

लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्यमहोत्सवानिमित्ताने लातूर अर्बन बँक आणि एमआयटीच्या वतीने आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवात ते बोलत होते. माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.

या वेळी माजी खासदार गोपाळराव पाटील, इस्त्रोतील सॅटेलाईट विभागाचे संचालक अलोककुमार श्रीवास्तव, उन्नत पंडित, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, भाजपचे नेते रमेश कराड, बँकेचे अध्यक्ष प्रदिप राठी, उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे उपस्थित होते.

डॉ. भटकर म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझ्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. मी सर्व पक्षांचा आदर ठेवतो. भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत. पण विकास साधताना त्यांनी एकत्र आले पाहीजे, एकत्र येऊन चर्चा करायला हवी. त्यातून निर्णय घ्यायला हवेत, असे मला वाटते.

हेही वाचा - 

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...
धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

भारताला पुढे आणण्यासाठी, प्रगल्भ विचाराचा देश निर्माण करण्यासाठी आणि त्या पुढे जाऊन विश्वगुरू होण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. भांडण करून, एकमेकांत वाद घालून, एकमेकांचा विरोध हे होणार नाही. देशाच्या विकासात कोणता पक्ष आड येता कामा नये, असेही ते म्हणाले.

वैज्ञानिकांना विज्ञानाचे अर्धवट ज्ञान

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, अशी अनेकांची धारणा झाली आहे. हे साफ चुकीचे आहे. सर्व भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान पोचले आहे. बऱ्याच जणांना या विषयात इनोव्हेशन करता येते; पण ते आपल्या भाषेतून मांडता येत नाही. तरीसुद्धा शोधनिबंध मराठीतून तयार करण्याचा प्रयत्न व्हावा.

अनेक वैज्ञानिकांना विज्ञानाचे अर्धवट ज्ञान आहे. पूर्ण ज्ञान ते आत्मसात करत नाही. त्याचा अनुभव घेत नाही, असे माझ्या लक्षात आले आहे. आपण विज्ञान जे शिकत आहोत, तेही अर्धवटच आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित अभ्यास केल्याशिवाय पूर्ण ज्ञान मिळणार नाही, असेही डॉ. भटकर यांनी सांगितले.

हाच धागा पुढे नेत चाकुरकर यांनी अध्यात्म हे विज्ञान आहे आणि विज्ञान हे अध्यात्म आहे. हे मान्य केल्याशिवाय आणि यातील ज्ञान ग्रहण केल्याशिवाय वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगितले. विकास म्हंटले की आपण वेस्टर्न देशाकडे पाहतो. ही चांगली बाब नव्हे; पण ते भारतीयांकडे कट, कॉपी, पेस्ट या नजरेतून पाहतात. हे चित्र बदलले पाहीजे. त्यासाठी नव्या पिढीने आव्हाने स्वीकारून पावले टाकायला हवीत. २०२२मध्ये भारताला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या टप्प्यावर आपण कुठंवर आलो आहोत, हे मागे वळून पाहिले पाहीजे, असे राहुल कराड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Bhatkar Said Follow Golwalkar With Gandhi Latur News Maharashtra News