हिंगोली : जमिनीतील गूढ आवाजाने ग्रामस्‍थांची उडाली झोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदेसह कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात सोमवारी (ता.5) रात्री 12.20 वाजता जमीनीतुन मोठा गुढ आवाज झाला एकापाठोपाठ एक तीन आवाज झाल्याने  नागरीकांची झोप उडाली आहे. या आवाजाने कोणतेही हाणी झाली नाही. 

हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदेसह कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात सोमवारी (ता.5) रात्री 12.20 वाजता जमीनीतुन मोठा गुढ आवाज झाला एकापाठोपाठ एक तीन आवाज झाल्याने  नागरीकांची झोप उडाली आहे. या आवाजाने कोणतेही हाणी झाली नाही. 

वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही दिवसापासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत. या आवाजामुळे गावकऱ्यात भिती निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसापुर्वी हे आवाज काही महिन्यानंतर येत होते. आता ते आठवड्यावर आले आहेत. त्‍यामुळे नागरीकात त्‍याची भिती आहे. या बाबत ग्रामस्‍थांनी जिल्‍हा प्रशासनाकडे माहिती दिली मात्र आवाजाची उकल काही झाली नाही. 

दरम्‍यान, वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे सोमवारी मध्यरात्री 12.20 वाजता एका पाठोपाठ एक सलग तीन आवाज झाले हे आवाज पांगरा गावासह वापटी, कुपटी, सिरळी या गावात देखील झाल्याचे गावकरी सांगत आहेत. या मुळे झोपेत असलेले गावकरी खडबडुन जागे झाले अनेकाच्या घरातील भांडे पडल्याचे आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. तसेच कळमनुरी तालुक्‍यातील  नांदापूर, हारवाडी, सोडेगाव तर औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी, आमदरी, सोनवाडी या गावात देखील हा 
आवाज आला आहे. 

एका पाठोपाठ तीन आवाज झाल्याने गावकऱ्यातून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आवाजाने मात्र कोणतीही हाणी झाली नाही. आवाजामुळे घरावरील टिनपत्रे व घरातील भांड्याचा आवाज झाल्याचे हारवाडी येथील  माजी सरपंच भास्‍कर ढाले यांनी सांगितले. या बाबत तहसील प्रशासनाकडे याची माहिती देखील देण्यात आली आहे. तसेच पांगरा शिंदे येथील सरपंच भागवत शिंदे यांनी जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थापनाकडे याची माहिती दिली आहे.

Web Title: villagers get scared because of scary noise in hingoli