हलक्या प्रतीचे गणवेश वाटप केल्याने लिंबेजळ ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप  

दीपक जोशी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

लिंबेजळगाव - हलक्या प्रतीचे गणवेश वाटप केल्याने ती परत करत जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. ही घटना गुरुवारी (ता.२९) तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे घडली.    

शिक्षण अधिकारी येऊन कारवाई करत नाही तोपर्यंत कुलुप उघडणार नसल्याचे सांगून ग्रामस्थांसह विद्यार्थी ग्रामपंचायतीसमोर येऊन निषेध नोंदवून आपापल्या घरी परतले.  

येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्यध्यापिका म्हणून विजया मोरे यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्या कामात कामचुकारपणा करत असल्याने शालेय समिती, ग्रामस्थ व मुख्याध्यापक यांच्यात कायमच कुरबुर होत होती. त्यातच शासनाने विद्यार्थ्यांना गणवेश करता निधी उपलब्ध करुन एकुण ३६६ विद्यार्थ्यांना गणवेश तयार करण्यात आले. ती जूनच्या अगोदर वाटप न करता मुख्याध्यापिकेने नवीन हलक्या प्रतीचे गणवेश आणुन शिक्षकाद्वारे वाटप केले. शासनाच्या निधीतील तयार गणवेशाचे वाटप सर्वांसमोर करावे अशी भुमिका घेत ग्रामस्थांनी गणवेश परत केले.

Web Title: villagers locked the school after distributing uniforms