सुकापुरवाडीकरांचा मतदानावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आणि विचित्र प्रशासकीय रचनेत अडकलेल्या सुकापुरवाडी ता.परभणी येथील ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीही बहिष्कार कायम ठेवल्याने प्रशासनाची धावपळ उडाली असून अधिकारी सुकापुरवाडीकडे रवाना झाले आहेत.

सुकापुरवाडी हे गाव दुधना नदीकाठावर परभणी तालुक्यातील शेवटचे गाव असून जिल्हा परिषद सर्कल टाकळी बोबडे तर महसुल सर्कल पिंगळी ता.परभणी आणि पोलीस ठाणे हिंगील जिल्ह्यातील हट्टा अशा विचित्र रचनेत अडकेल्या गावात कोणत्याही मुलभुत सुवीधा नाहीत. तसेच ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी  हिंगोली जिल्हा जवळ असल्याने  दळणवळणासाठी  दुधना नदीवर पुल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.त्यासाठी प्रशासनाकडे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार मतदानाच्या दिवशी गुरुवारी (ता.18) बहिष्कार कायम ठेवला आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने सुकापुरवाडीकडे धाव घेतली आहे.

Web Title: villagers of sukapur boycotts voting