औरंगाबाद जिल्ह्यात 34 गावे बुद्रूक तर 31 गावे खुर्द

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : आपल्या गावचा माणूस दुसऱ्या राज्यात तर सोडाच नुसता परजिल्ह्यात जरी भेटला तर किती अप्रुप असते विचारता सोय नाही. मग एकमेकांना विचारपुस होते कोणत्या गावचे. त्यात एक म्हणणार मी अमुक गावचा तर दुसराही म्हणणार अरेच्चा मीपण त्याच गावचा मग कधी गावात भेटलो कसे नाही. यानंतर लगेच दुसरा प्रश्‍न तुमचे बुद्रूक की खुर्द. मात्र हे संभाषण ऐकणाऱ्याला बुदूक अन खुर्द हा काय प्रकार असा सहाजिकच प्रश्‍न पडतो. तसाच प्रश्‍न महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातुन फिरताना खुर्द काय अन बुद्रूक काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. चिल्लर, खुर्दा याच्याशी मिळता जुळता शब्द म्हणजे खुर्द. खुर्द म्हणजे छोटा आणि बुद्रूक म्हणजे मोठा, असे औरंगाबाद जिल्ह्यात 34 गावे बुद्रूक तर 31 गावे खुर्द आहेत.

महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांच्या नावाअगोदर बुद्रुक व खुर्द लावलेले असते. शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता. त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषेचा बोलीभाषेवर प्रभाव आहे. वेगवेगळ्या शाह्या व मोगलांचा अंमल असलेल्या प्रदेशात बुद्रूक व खुर्द शब्दांचा वापर केला जायचा. काही ठिकाणी उंचावर असलेल्या एकाच गावाचे दोन भाग वाढत जाउन वरचे आणि खालचे गाव असे उल्लेख झाले. याशिवाय जिल्ह्यात बोरगाव बाजार, बोरगाव कासारी, बोरगाव सरवानी, आडगाव, आडगाव सरक, आडगाव माहुली अशा सारख्या नावांचीही गावे आहेत.

आपल्या बोलीभाषेवर इस्लामिक राजवटीचा प्रभाव आहे. भाषेवर उर्दूचा व फारशीचा प्रभाव जाणवतो. त्यावेळचे प्रचलित असलेले खुर्द व बुद्रूक शब्द आहेत. साधारणत: मानव वस्ती करुन रहायला सुरुवात झाल्यापासून जिथे पाण्याची मुबलक उपलब्धता तिथेच माणुस वस्ती करुन रहायचा. त्यानुसार नदी, ओढ्यांच्या जवळ गावे वसली. कलांतराने नदी, ओढ्याच्या पलिकडेही लोकवस्ती वाढत जाउन तिथेच दोन सारख्या नावांची दोन गावे झाली. कधी हे भाग एकसारखे असायचे तर कधी लहान मोठे यामुळे गावाचे नाव सारखे असले तरी मोठ्या गावाला बुद्रूक म्हणजे बुजुर्ग आणि छोट्या गावाला खुर्द म्हणुन ओळख मिळाली आहे. बुद्रूक हा बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश आहे.
- प्रा. डॉ. दासू वैद्य कवी, गीतकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

34 बुद्रुक, 31 खुर्द
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडील नोंदीनुसार सिल्लोड तालूक्‍यातील खुर्द, बुद्रूक गावे गोळेगाव , मसला, मोडा, टाकळी जिवरग, वांगी, पानवडोद. फुलंब्री तालूक्‍यातील आडगाव, बोधेगाव, बाभुळगाव, शेलगाव, शिरोडी, बोडगाव, सोनारी, सताळा, औरंगाबाद तालूक्‍यातील आडगाव, पिंपरी, सोयगाव तालूक्‍यातील वरखेडी, खुलताबाद तालूका देवळाणा, निरगुडी, पैठण तालूक्‍यातील अडूळ, दादेगाव, गेवराई, हर्शी, कडेठाण, तांडा, पाचोड, रांजणगाव, सोनवाडी, वरुडी, वरवंडी. गंगापुर तालूक्‍यातील धामोरी, मालूंजा, नारायणपुर, कन्नड तालूक्‍यात बोरसर, चिंचखेडा, जवखेडा, जावळी, पळशी, राहिला , टाकळी या खुद्र व बुद्रूक गावांचा औरंगाबाद जिल्ह्यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com