भाजपला झोंबली मुंडेंवरील मेटेंची टीका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

भाजप-शिवसंग्रामध्ये पत्रक ‘वॉर’, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विकासात राजकारण करीत असल्याची टीका केली. ती भाजपला झोंबली. यातून भाजप आणि शिवसंग्रामध्ये पत्रक वॉर सुरू झाले असून, दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान, आमदार मेटे आज इथे तर उद्या तिथे असे राजकीय जीवन कंठत आहेत, अशी टीका रमेश पोकळे यांनी सोमवारी (ता. सात) पत्रकातून केली. आमदारकीसाठी तडजोडी केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत आमदार मेटेंना भाजप पक्षाचे चिन्ह होते; म्हणून ७५ हजारांवर मते मिळाल्याचा दावा श्री. पोकळे यांनी केला; परंतु पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी नाकर्तेपणाचे खापर भाजपच्या कार्यकर्त्यांवर मेटे फोडत असल्याचे पोकळे म्हणाले. पोकळेंवरही क्षीरसागरांची दलाली करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी लागलीच मंगळवारी (ता. आठ) केला. रमेश पोकळे यांना राजकारणात आमदार विनायक मेटे यांनीच आणल्याची आठवणही पाटील यांनी करून दिली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामने महायुतीमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते. 

याला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे साक्षीदार आहेत याची कल्पना पोकळेंना नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. 

श्री. फडणवीस यांच्या विनंतीवरून मेटेंनी बीडमध्ये विधानसभा लढविल्याचा दावाही पत्रकात करण्यात आला. श्री. पोकळेंना मेटेंनी राजकीय जन्म दिला; पण नंतर क्षीरसागर, पंडित आणि आता मुंडेंची ते भाटगिरी करत असल्याचा टोलाही लगावला आहे.

Web Title: vinayak mete commented on pankaja munde