सेना- भाजपचा वाद म्हणजे नवरा, बायकोचं भांडण! - विनायक मेटे

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद -  कॉंग्रेसच्या नेत्यांची मुले भाजपमध्ये येऊ पाहत आहेत. यावरूनच कॉंग्रेस, राष्ट्रवादीला फारसे भवितव्य नसल्याचेच चित्र असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे केली. तसेच शिवसेना - भाजपमध्ये सुरू असलेले वाद हे नवरा - बायकोचे भांडण असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले; मात्र नवरा कोण, या प्रश्‍नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. 

शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त 27 जानेवारी रोजी जबिंदा लॉन येथे निर्धार मेळावा होईल. याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता.27) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार श्री. मेटे म्हणाले, आघाडी सरकार सत्तेवर असतानाच आपण त्यांच्यातून बाहेर पडलो; मात्र मला दिलेली सामाजिक आश्‍वासने पूर्ण केली असली तरी राजकीय आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलेले नाही. आगामी काळात विचार न केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. 

आमचा निर्धार मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आता 27 जानेवारीला होईल. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मंडळींची उपस्थिती राहील. पक्ष म्हणून आम्हीदेखील आमच्या निर्णयावर ठाम आहोत. गरज पडल्यास सत्तेतून बाहेर पडू'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्री संवेदनशील का नाहीत? 
आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सामान्य माणसांचे प्रश्‍न लगेच सुटायचे. या सरकारमधील मंत्री संवेदनशील नाहीत, असा आरोप होतोय, याबद्दल आपला काय अनुभव, असा प्रश्‍न श्री. मेटेंना विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. आणखी काही मंत्र्यांचे काम पण चांगले असल्याचे म्हटले; मात्र सर्वच मंत्री संवेदनशील आहेत, असे म्हणता येणार नाही, हेही नमूद केले.

Web Title: Vinayak Mete Talking on Shivsena and BJP Dispute Politics