परभणी : दुष्काळ पहाणी पथकाकडून परभणी तालुक्याची भेट रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

परभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देणार होते. परंतू या पथकाने परभणी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे रद्द केले आहे.

केंद्रातील नीती आयोगाचे सहसल्लागार महेश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ समुपदेशक एस.सी. शर्मा, ग्रामविकास विभागाचे अधिकारी एस.एन. मिश्रा, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर आणि रांजनकर या अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. परंतू या पथकाने सेलू व मानवत तालुक्यातील दोन गावांना भेटी देण्याचे ठरविले आहे. परंतू दौऱ्यात असलेल्या परभणी तालुक्यातील पेडगाव या दौऱ्यातून अचानक रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी दिली.
 
Web Title: visit cancel by drought observation squad in parbhani